शनिवार, २७ एप्रिल, २०१३

CHALU GADAMODI



1. 20 जानेवारी 2013 रोजी पार पडलेल्या 58 व्या फिल्मफेअर पुरस्कारात कोणत्या अभिनेत्याला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' म्हणून गौरविले गेले?B. रणबीर कपूर (बर्फी)
2. खालीलपैकी कोणती एक संयुक्त राष्ट्रसंघटनेची अधिकृत भाषा नाही.C. जपानी
3. 'आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस' कधी साजरा केला जातो?B. 1 ऑक्टोबर
4. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी 'हाय लॅटीट्यूड फिजीक्स लॅबोरेटी ' (High latitude cloud Physics Laboratory) विकसित केली जात आहे?C. महाबळेश्वर
5. डिसेंबर 2012 मध्ये कोणत्या देशाच्या संघाला नमवत भारतीय पुरुष संघाने 'तिसरा कबड्डी विश्वचषक' जिंकला ?B. पाकिस्तान
6. पृथ्वी परीक्षणासाठी 1984 साली सोडलेला जगातील सर्वात जुना असा 'लॉडसॅट 5' हा उपग्रह थांबविण्याचा निर्णय अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी घेतला आहे ?A. अमेरीका
7. डिसेंबर 2013 मध्ये निधन पावलेले प्रसिध्द क्रिकेट समालोचक 'टोनी ग्रेग' यांनी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद सांभाळले होते ?B. इंग्लंड
8. 'सायली गोखले' ही खेळाडू कोणत्या क्रिडाप्रकाराशी संबंधित आहे ?B. बॅडमिंटन
9. 'हॅार्नबिल फेस्टिवल' भारतातल्या कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?B. नागालँड
10. 'रोमान्ससिंग विथ लाईफ' हे कोणत्या अभिनेत्याचे आत्मचरीत्र आहे ?C. देव आनंद
1. निर्वाचित केलेल्या लोकप्रतिनिधींना परत बोलविण्याच्या अधिकाराचा भारतात सर्वप्रथम वापर डिसेंबर 2012 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आला ? C. राजस्थान
राजस्थानमधील मांगरोल नगरपरिषदेचे नगराध्यक्षांना पदावरून हटविण्यासाठी या अधिकाराचा वापर करण्यात आला.
2. 2012 चा सरस्वती सन्मान कोणाला बहाल करण्यात आला ?B. रोहित गौतम
3. 2012 च्या 'नॉर्मन बोरलॉग' पुरस्काराने कोणाचा सन्मान करण्यात आला ?A. अदिती मुखर्जी
4. 2012 मध्ये रॉकफेलर जीवन गौरव पुरस्कार कोणत्या भारतीयाला/ अनिवासी भारतीय व्यक्तिमत्वाला प्राप्त झाला D. रतन टाटा
5. जागतिक सौर दिन कधी साजरा केला जातो ?D. 3 मे
6. मार्च 2012 मध्ये निधन पावलेले माणिक गोडघाटे यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता ? A. साहित्यिक
7. डिसेंबर 2012 मध्ये केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळाने मान्यता दिलेल्या 'जमीन अधिग्रहण विधेयका'नुसार खाजगी प्रकल्पासाठी ____, तर निमसरकारी कंपन्यांसाठी ______ जमीन अधिग्रहण होणे गरजेचे आहे.C. 80%, 70%
8. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने 'पहिला आंतरराष्ट्रीय बालिका दिन' (First International Day of Girl Child ) कधी साजरा केला गेला ?A. 11 ऑक्टोबर 2012
9. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) विद्यमान महासंचालक कोण आहेत ? A. प्रणव सहाय
10. भारताचे विद्यमान केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत ?. सुशीलकुमार शिंदे
Sunday 17 February 2013प्रश्नमंजुषा -354
1. भारतीय हवाईदलासाठी कोणत्या इटालियन कंपनीशी केलेला हेलिकॉप्टर खरेदीचा करार त्यातील लाचखोरीच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरला आहे ?D. ऑगस्टावेस्टलँड
2. सेबी अर्थात 'भारतीय प्रतिभूती आणि विनियमन बोर्ड'ने उपकंपन्यांद्वारे गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोणत्या उद्योगसमूहाची स्थावर मालमत्ता, बँक खाती, डीमॅट खाती यांच्या जप्तीचेगोठविण्याचे आदेश दिले आहेत ? A. सहारा                                                                                                                        



3. ऑक्टोबर 2012 मध्ये 'महाराष्ट्र राज्य सिंचन परिषद' कोठे पार पडली D. शिरपूर (धुळे)
4. भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी कोठे स्थापन करण्यात आली आहे ? C. चेन्नई
5. 2012 च्या सी.के.नायडू पुरस्काराने कोणत्या क्रिकेटपटूला सन्मानित करण्यात आले ? A. सुनील गावस्कर
6. युनो (UNO) कोणत्या कालावधीत जैविक बहुविविधता (Biodiversity) दशक साजरे करत आहे ? C. 2010-2020
7. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रीमंडळात गेलेले श्री.प्रतिक पाटील यांच्याकडे कोणते मंत्रिपद आहे ? D. राज्यमंत्री, कोळसा
8. भारताच्या राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष __________________ हे आहेत. A. सॅम पित्रोदा
9. RBI च्या सुधारित निर्देशांनुसार सीटीएस चेकप्रणालीचा वापर कोणत्या तारखेनुसार बंधनकारक होणार आहे
 1 एप्रिल 2013
10. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण जानेवारी 2013 मध्ये सेवानिवृत्ती झाले. त्यांची जागा आता कोणत्या खात्यनाम अर्थतज्ज्ञांनी घेतली आहे ?A. डॉ.उर्जित पटेल


1. अकराव्या पंचवार्षिक योजना काळात महाराष्ट्र सरकारने किती टक्के विकास दर साध्य केला ?B. 8.6

2. सिंचन प्रकरणातील गैरव्यवहारांची स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष कोण आहेत माधव चितळे
3. माजी लोकसभा अध्यक्ष पी.ए.संगमा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून विभक्त होत कोणता नवा पक्ष स्थापन केला आहे ?A. नॅशनल पीपल्स पार्टी
4. केंद्रीय कायदामंत्र्यांशी मतभेद झाल्यामुळे रोहिंटन नरिमन यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या पदावर विराजमान होते ? A. सॉलिसिटर जनरल
कायदामंत्र्यांशी मतभेद झाल्यामुळे रोहिंटन नरिमन यांनी सोमवारी सॉलिसिटर जनरलपदाचा राजीनामा दिला. मात्र, पंतप्रधान आणि कायदामंत्र्यांकडे सोपवलेल्या राजीनाम्यात त्यांनी कोणतेही कारण नमूद केलेले नाही. 
केंद्रीय कायदामंत्री अश्विनकुमार यांच्याशी मतभेद झाल्यामुळे नरिमन यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले. कायदामंत्री आणि मंत्रालयाकडून नरिमन यांना काही निर्देश देण्यात आले होते. त्यामुळेही ते नाराज होते. नरिमन यांना आपण शुभेच्छा देतो, एवढीच प्रतिक्रिया अश्विनकुमार यांनी नरिमन यांच्या राजीनाम्यावर दिली आहे.
5. कारगील युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी काश्मीर सीमा (एलओसी) पार करुन भारतीय हद्दीत प्रवेश केला होता, असा गौप्यस्फोट आयएसआयच्या जनसंपर्क विभागाचे माजी संचालक अशफाक हुसैन यांनी केला आहे. हुसेन ह्यांनी ज्या पुस्तकात ह्या बाबीचा उल्लेख केला आहे, त्याचे नाव काय ?D. विटनेस टू ब्लंडर             अर्थात भारतीय सैन्य प्रमुखांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
6. 2012 चा मराठीमध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' ह्या लघुकथेसाठी कोणत्या लेखकाला मिळाला ?B. जयंत पवार
7. देशातील पहिला 'ई-ऑफिस प्रणाली जिल्हा' म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा अलीकडेच गौरव करण्यात आला ? D. सिंधुदुर्ग
8. पहिली अंध विश्वकरंडक T-20 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली ? A. भारत
9. विदित गुजराथी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? A. बुद्धिबळ
नाशिकचा विदित गुजराथी हा महाराष्ट्राचा तिसरा तर देशातील तिसावा ग्रॅन्डमास्टर बनला.
10. आयपीएल मधील हैदराबादचा संघ आता कोणत्या नावाने ओळखला जाईल ?. सनरायझर्स
 छेडछाडीपासून महिलांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने बंगळुरूमध्ये पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेचे नाव काय आहे ?C. अभया      . कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्या पत्नी शिल्पा यांच्या हस्ते बुधवारी या मोहिमेचा शुभारंभ झाला.
काय आहे मोहीम : सब-इन्स्पेक्टरसह दोन महिला पोलिसांच्या पथकाची अभया व्हॅन शहरात गस्त घालणार.
2. भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) कोणत्या खंडात नव्याने हवामान अंदाज वर्तविणारे केंद्र सुरू केले जाणार आहे ?D. आफ्रिका 
देशाची सुमारे ७० टक्क्यांहून अधिक जनता शेतीवर अवलंबून... अवेळी आणि असमान पावसाचा फटका... अन् पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे होणारे नागरिकांचे हाल... या आशिया-आफ्रिका खंडात समसमान असणा - या प्रश्नांची उकल व्हावी, यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) आफ्रिकेत मध्यम टप्प्याचा हवामान अंदाज वर्तविणारे केंद्र सुरू केले जाणार आहे. हे केंद्र केनियातील नैरोबीत उभारले जाणार आहे. त्या दृष्टीने काही जागांची चाचपणी झाली असून, पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये हे केंद्र कार्यान्वित करण्याचा सरकारचा मनोदय आहे.
3. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?B. जॉन केरी
अमेरिकेच्या विद्यमान परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन शुक्रवारी पायउतार होत असताना , त्यांच्या जागी जॉन केरी यांची निवड करण्यात आली आहे .
बराक ओबामा यांचे निकटवर्तीय केरी यांचा परराष्ट्र धोरण , विशेषत : अफगाण - पाकिस्तानविषयी अभ्यास आहे .
4. ' यूएन ' च्या महिला विभागाच्या प्रमुख कोण आहेत ?A. मिशेल बॅचलेट
5. मुलींमधील _______________ रोखण्यासाठी त्यांना दर आठवड्याला आयर्न फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे.A. रक्ताल्पता (अ‍ॅनिमिया)
6. प्रश्न क्रमांक 5 मधील योजना कोणत्या मंत्रालयाने हाती घेतली आहे ?B. आरोग्य मंत्रालय 
मुलींमधील रक्ताल्पता (अ‍ॅनिमिया) रोखण्यासाठी त्यांना दर आठवड्याला आयर्न फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. देशभरातील 10 ते 19 वर्षे वयाच्या मुलींना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. येत्या तीन महिन्यांत आरोग्य मंत्रालय ही योजना कार्यान्वित करणार असून दर सोमवारी विद्यार्थिनींना आयर्न फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या दिल्या जाणार आहेत. 
लोहाचे प्रमाण वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
7. सजीवसृष्टीला पोषक असणारे घटक मंगळ ग्रहाच्या भूपृष्ठाखाली बराच काळपर्यंत होते , असा दावा __________मधील शास्त्रज्ञांनी केला आहे. B. ब्रिटन 
सजीवसृष्टीला पोषक असणारे घटक मंगळ ग्रहाच्या भूपृष्ठाखाली बराच काळपर्यंत होते , असा दावा ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी केला आहे. मंगळावर सूक्ष्मजीवांचे वास्तव्य होते , असेही त्यांनी म्हटले आहे. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ अबेरडीन आणि नॅचरल हिस्ट्री म्युझियम यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या अभ्यास प्रकल्पामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
8. देशातील ग्रामीण आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी भारताने कोणत्या देशाशी लवकरच करार करणार आहे ? 
D. ब्रिटन       देशातील ग्रामीण आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी भारत आता ब्रिटिशांकडून धडे गिरवणार आहे . तेथील राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेसारखी ( नॅशनल हेल्थ सिस्टिम ) व्यवस्था देशातही उभारण्यात येणार आहे . त्यासाठी भारत आणि ब्रिटन लवकरच करार करणार आहेत .
9. फॉरेन एक्सचेंज मेन्टेनन्स एक्ट (फेमा)चे उल्लंघन केल्याचा आरोप करत अंमलबजावणी संचालयनाने आयपीएल मधील कोणत्या संघाला शंभर कोटी रुपयांचा दंड केला आहे ? A. राजस्थान रॉयल्स 
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा या टीमचे सहमालक आहे.
10. काश्मीरमधील मुलींचा पहिला रॉक बॅँड दुर्दैवाने एका फतव्यानंतर बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ह्या बॅँडचे नाव काय ? A. प्रगाश    काश्मीरमधील मुलींचा पहिला रॉक बॅँड प्रगाशला सोमवारी सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला. गाणे व वाद्य वाजवणे इस्लामविरोधी असल्याने ते बंद करण्याचा फतवा मुफ्तींनी रविवारी काढला होता. त्यानंतर दुस-या दिवशी तीन मुलींनी बँडमधून माघार घेत असल्याचे सांगितले. दरम्यान, महिला संघटनांनी फतव्यावर टीका केली आहे.

1. "A View From The Outside" ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?C. पी.चिदंबरम
2. 'सुपर मॉम' ह्या नावाने कोणती भारतीय महिला खेळाडू परिचित आहे?B. मेरी कोम
3. खालीलपैकी कोण 'विकिपिडीया' ह्या सर्वात मोठ्या ऑनलाईन संदर्भग्रंथाचे संस्थापक मानले जातात?D. जिमी बेल्स
4. 2012 चे अलिप्त राष्ट्र संघटनेचे (NAM) संमेलन कोणत्या देशात पार पडले?B. इराण
5. 'युनिसेफ' चा उत्कृष्ट गावाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार 'शंकरपूर' या गावास प्राप्त झाला. हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?B. गडचिरोली
6. केंद्र सरकारने 'नवीन दूरसंचार' धोरणास कोणत्या दिवशी मान्यता दिली?B. 31 मे 2012
7. 2011 च्या जनगणनेनुसार राज्यातील कोणत्या जिल्ह्यात 'स्त्री-पुरुष' प्रमाण (Sex Ratio) सर्वात कमी आहमुंबई शहर
8. 0-6 ते वयातील मुला-मुलींचे सर्वात कमी प्रमाण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? (2011 च्या जनगणनेनुसार)
A. बीड
9. 2011 च्या जनगणनेनुसार राज्यातील सर्वाधीक साक्षर जिल्हा कोणता आहे?D. ठाणे
10. 'महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना' अंतर्गत देशात सर्वाधीक मजूरी कोणत्या राज्यात दिलीजाते?हरीयाणा

1. 2012 मध्ये कोणता सुधारीत 'इंटरनेट प्रोटोकॉल' वापरात आणला गेला?D. IP V6
2. 'शिकत असताना कमवा' (Earn While You Learn) ही अभिनव योजना नोव्हेंबर 2012 मध्ये भारत सरकारच्या कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरु केली आहे?D. पर्यटन मंत्रालय
3. भारताच्या महत्वाकांक्षी 'राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियाना' ला कोणाचे नाव देण्यात आले आहेB. पं. जवाहरलाल नेहरू
4. जुलै 2012 मध्ये 'चंद्रपूर' ला व्याघ्र जिल्हा व असंरक्षित क्षेत्रातील वाघांचे संरक्षित क्षेत्रांतील वाघांच्याच मार्गदर्शक तत्त्वांनुसार संरक्षण केले जावे या प्रमुख मागण्यांसाठी कोणत्या वन्यजीव कार्यकर्त्याने उपोषण केले होते?A. बंडू धोत्रे
5. दूरवरून नियंत्रित करता येणे शक्य असलेली अशा प्रकारची पहीलीच संगणकीय प्रणाली (Operating System ) मायक्रोसॉफ्ट कंपनीने अलीकडेच बाजारात आणली ह्या प्रणालीचे नाव काय?. विंडोज सर्व्हर 2012
6. 'राष्ट्रीय अन्न बँकींग जाळे' (India National Food Banking Network [IFBN]) अंतर्गत भारतातील पहिली अन्न बँक (Food Bank) कोठे आकारात येत आहे?D. दिल्ली
7. भारत सरकारने पाण्याच्या जाणीवपूर्वक वापराविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने - 'भारत जल आठवडा'(India Water Week) कधी साजरा केला?B. एप्रिल 2012
8. एल.पी.जी. सिलेंडर साठी लागणारा प्रतिक्षा कालावधी (Waiting Period) कमी करण्यासाठी 'पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसमंत्रालया' ने सी. डॅक संस्थेसमावेत कोणत्या प्रकल्पावर काम सुरु केले आहे?A. लक्ष्य
9. जागतिक मूत्रपिंड दिन (World Kidney Day) कधी साजरा केला जातो?B. मार्च 9
10. जागतिक ग्राहक हक्क दिन (World Consumer Rights Day) कधी साजरा केला जातो ?. 15 मार्च
1. 'ब्लेड रनर' म्हणून परिचित असलेला दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्या अपंग धावपटूला आपल्या गर्लफ्रेंडचा खून केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली होती ?A. ऑस्कर पिस्टोरियस
2. ब्रिटनमध्ये बारा वर्षे वयाच्या कोणत्या भारतीय वंशाच्या मुलीने कॅट्टेल आयआयआयबी टेस्ट ह्या मेन्सा बुद्ध्यांक मापन चाचणीत 162 गुण प्राप्त केले,त्यामुळे तिचा बुद्ध्यांक आइनस्टाइन आणि स्टीफन हॉकिंगपेक्षाही जास्त असल्याची चर्चा सुरु आहे ?B. नेहा रामू
3. नोबेल पुरस्काराचा लिलाव करण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना अलीकडेच समोर आली आहे. यात कोणाच्या नोबेल परितोषिक विजेत्याच्या पदकाचा लिलाव होणार आहे?C. फ्रान्सिस क्रीक डीएनएचा शोध लावणारे फ्रान्सिस क्रीक यांना मिळालेला नोबेल पुरस्कार त्यांचे कुटुंबीय लिलावात मांडणार आहेत. त्यात पदक आणि मानपत्राचा समावेश आहे. हा पुरस्कार त्यांना 50 वर्षांपूर्वी मिळाला होता.
नोबेल पुरस्काराचा लिलाव करण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे. सन्मानाचे हे पदक 10 एप्रिल रोजी न्यूयॉर्कमध्ये होणा-या लिलावात मांडण्यात येणार आहे. यातून सुमारे 13 कोटी 52 लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे. लिलावातून मिळणा-या रकमेचा काही भाग लंडनमध्ये सुरू होणा-या फ्रान्सिस क्रीक इन्स्टीट्यूटसाठी देण्यात येणार आहे. डीएनएचा शोध लागून आता 60 वर्षे लोटली आहेत.
4. ज्या देशातील पोलिस आंदोलकांना झोडपून काढतात तेथील सरकारचा मी प्रमुख राहूच शकत नाही, असे सांगत कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ?C. बल्गेरिया ज्या देशातील पोलिस आंदोलकांना झोडपून काढतात तेथील सरकारचा मी प्रमुख राहूच शकत नाही, असे सांगत बल्गेरियाचे पंतप्रधान बोयको बोरिसोव्ह यांनी बुधवारी राजीनामा दिला. बल्गेरिया हा युरोपीय संघातील सर्वात गरीब देश आहे. वीज दरवाढीच्या विरोधात राजधानी सोफियामध्ये मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात 14 आंदोलक जखमी झाले होते.
5. कार्टून शो डोरेमॉनच्या प्रसारणावर बंदी कोणत्या देशाने घातली आहे ?C. बांगलादेश बांगलादेश सरकारने कार्टून शो डोरेमॉनच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. देशात टीव्ही चॅनल्सवर जपानी कार्यक्रमांचे हिंदीत प्रसारण केले जाते. या मालिकेमुळे मुलांवर नकारात्मक परिणाम होत होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
6. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कोणत्या महिलेला नव्या गृहमंत्रीपदी नियुक्त केले आहे?B. सॅली ज्वेल  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सॅली ज्वेल यांना देशाच्या नव्या गृहमंत्रीपदी नियुक्त केले आहे. ओबामांच्या पहिल्या कार्यकाळात केन सालाजर हे अमेरिकेचे गृहमंत्री होते. आता त्यांच्या जागी सॅली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
7. जगप्रसिद्ध सायन्स पार्क सिटी ऑफ सायन्सआगीच्या भक्षस्थानी पडल्याने पूर्णपणे बेचिराख झाले. हि घटना कोणत्या देशात घडली?A. इटली
8. ह्युगो शावेज यांचे बुधवारी पहाटे कर्करोगाने निधन झाले. ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते ?D. व्हेनेझुएला व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती ह्युगो शावेज यांचे बुधवारी पहाटे कर्करोगाने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. अमेरिकेच्या नाकावर टिच्चून दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या छोट्याशा देशात शावेज यांनी समाजवादी राजवट आणली.
9. दिल्लीत 16 डिसेंबर 2012 च्या रात्री धावत्या बसमधील गॅगरेपची शिकार ठरलेल्या 'दामिनी'ला मरणोपरांत कोणत्या देशाकडून 'आंतरराष्ट्रीय महिला वीरता पुरस्कार' (इंटरनॅशनल वूमन ऑफ करेज अवॉर्ड) जाहीर झाला आह?. अमेरिका  दिल्लीत 16 डिसेंबर 2012 च्या रात्री धावत्या बसमधील गॅगरेपची शिकार ठरलेल्या 'दामिनी'ला मरणोपरांत येत्या 8 मार्चला, जागतिक महिला दिनी सम्मानित करण्‍यात येणार आहे. अमेरिकेतर्फे 'दामिनी'ला 'आंतरराष्ट्रीय महिला वीरता पुरस्कार' (इंटरनॅशनल वूमन ऑफ करेज अवॉर्ड) जाहीर झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी महिला मिशेल ओबामा आणि अमेरिकेचे परराष्‍ट्र मंत्री जॉन कॅरी एका कार्यक्रमात 'दामिनी'च्‍या आईवडिलांना हा पुरस्‍कार देणार आहेत.
10. आयुष्यात पाऊल टाकतानाच एचआयव्हीबाधित असलेल्या मुलीवर जन्माच्या 30 तासानंतरच उपचार सुरू करण्यात आले होते. ही बालिका आता अडीच वर्षांची असून वर्षभरापासून कोणतेही औषध न घेता तिची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत आहे. एचआयव्हीवरील यशस्वी उपचाराचे हे आतापर्यंतचे अपवादात्मक प्रकरण एचआयव्हीबाधित लहानग्यांच्या भविष्यातील अंधकार शकते. हि घटना कोणत्या देशातील आहे? B. अमेरिका




Bottom of Form