सोमवार, २५ मार्च, २०१३

BHUGOL

भूगोल
1) महाराष्ट्र राज्यात फळपिकांच्या उत्पन्नामध्ये केळी नंतर ................दुसरया स्थानावर आहे.D.  द्राक्ष
2) कागद उद्योगासाठी....................कच्चा माल म्हणून वापरला जातो.A.  बांबू
3) महाराष्ट्रातील सर्वाधिक वनोत्पादन ...........पासून मिळते.A.  गवत
4) पिक कर्जाची परतफेड ...............महिन्यापर्यंत लागते.C.  १८
5) हरित क्रांतीमुळे .............. पिकांच्या उत्पादनात वाढ झाली.D.  अन्न-धान्य
6) फोकलंड बेटे ________ महासागरात आहेत.B.  अटलांटिक
7) सूर्य ग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र व पृथ्वी यांची स्थिती अनुक्रमे ____________ अशी असते. A.  सूर्य, चंद्र, पृथ्वी
8) कोणत्याहि दोन तरयांतील अंतर ________ या परिमाणाने मोजतात.C.  प्रकाशवर्ष
9) चंद्राचे परिवलन व परिभ्रमण होण्याचे ________ कालावधी लागतो.  D.  परिवलन व परिभ्रमण या दोन्हींना सारखाच.
10) खालीलपैकी कोणत्या वायूचे अधिक नैसर्गिक पर्यावरणासाठी हानिकारक आहे ?  क्लोरोफ्लुरोकार्बन  कार्बन डायऑक्साईड  कार्बन मोनोक्साईड  वरील सर्वD.  वरील सर्व
11) मुंबई - नाशिक हमरस्त्यावर ........... हा घाट आढळतो.B.  थळ
12) खालीलपैकी कोणत्या राज्यात दशलक्षी शहर नाही?C.  छत्तीसगड
13) भारतातील ................ हे राज्य सर्वाधिक नागरीकरण झालेले आहे?A.  महाराष्ट्र
14) महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना ........... जिल्ह्यात उभारण्यात आला?C.  अहमदनगर
15) कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते?C.  नाशिक
16) नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे?B.  तोरणमाळ
             17) गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आढळतात?B.  ठाणे
             18) मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली?B.  1853
19) महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा..........आहे.D.  गडचिरोली
20) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठया प्रमाणावर आहेत..  यवतमाळ
21) मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना लागणारे राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन..........  भुसावळ
22) भिवंडी व मालेगाव याव्यतिरिक्त राज्यात .............येथेही हातमागाचा उद्योग मोठया प्रमाणावर चालतो..  इचलकरंजी
                23) मांजरा पठार कोणत्या भागात आहे?A.  मराठवाडा
24) महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.A.  
25) 'दुधंगंगा' या योजनेचा फायदा होणारा जिल्हा..........C.  कोल्हापूर
26) राज्यातील नेरळ-माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?A.  अरुंदमापी
27) खालीलपैकी कोणती नदी राज्यातील पठारी प्रदेशातून वाहत नाही?.  सूर्या
28) खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरीकाठी वसलेले नाही?D.  पंढरपूर
29) महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे.खालीलपैकी कोणत्या राज्यांचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही?D.  तामिळनाडू
30) कुकडी योजनेचा फायदा .............. या दोन जिल्ह्यांना होणार आहे.A.  पुणे व अहमदनगर
31) महाराष्ट्रातील ......... या विभागात सर्वात कमी वने आहेत.C.  मराठवाडा
32) .............हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ' कयाधू ' नदीच्या काठी वसले आहे.B.  हिंगोली
33) खालीलपैकी ................या प्राण्यास ' महाराष्ट्राचा राज्यप्राणी ' म्हणून गणले जाते.C.  शेकरू
34) गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी ..........येथे लोखंडाचे साठे आढळतात.A.  देऊळगाव
35) महाराष्ट्राच्या एकूण जलसिंचन क्षेत्रापैकी सुमारे ........... टक्के क्षेत्र विहिरीच्या पाण्याने भिजवले जाते.D.  ५६
36) 'तोरणा ' हे पर्वत शिखर महाराष्ट्राच्या ...........जिल्ह्यामध्ये आहे,C.  पुणे
37) .............हि महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी आहे.D.  तापी
38) भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत..........आहे.D.  अरवली
39) भारताच्या प्रमाणवेळेचे रेखावृत्त ........... या शहरावरून जाते.D.  अलाहाबाद
40) 'राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५०' ने खालीलपैकी कोणती दोन ठिकाणे जोडली गेली आहेत ?C.  संगमनेर - पुणे
41) राजमाता जिजाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील 'सिंदखेड-राजा' हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडते ?B.  बुलढाणा
42) खालीलपैकी कोणत्या पिकाचा महाराष्ट्रात उत्पादित होणारया नगदी पिकांमध्ये समावेश करता येणार नाही ?D.  ताग
43) महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात 'कन्हान' येथे व भंडारा जिल्ह्यात 'तुमसर' येथे ...........हा धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत .A.  मँगनीज
44) कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले 'पोफळी' येथील जलविद्युत केंद्र ..........या जिल्ह्यात मोडते.A.  रत्नागिरी
45) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील .........हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय.C.  आंबोली
46) महाराष्ट्रात ............. या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात .A.  चंद्रपूर
47) .........या प्रकारच्या वारयांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो .C.  आवर्त
48) खालीलपैकी तीन नद्या या कृष्णेच्या उपनद्या आहेत.चौथी वेगळी नदी कोणती ?D.  इंद्रावती
49) भारतातील या टेकड्या प्राचीन जीवावशेषांबद्दल प्रसिद्ध आहे ....B.  शिवालिक
50) 'ऐजवाल' ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे ?C.  मिझोराम
51) भारतातील ..........हे शहर सध्या दोन राज्ये व एक संघराज्य प्रदेश यांच्या राजधानीचे ठिकाण आहेC.  चंदिगढ
52) सुझुकी कंपनीचा मारुती मोटर्सचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे ?B.  गुरगाव
53) कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले टिटाघर कोणत्या राज्यात आहे ?B.  पश्चिम बंगाल
54) खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे .D.  प्लुटोनिअम-नेवेली (तामिळनाडू)
55) दगडी कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले 'राणीगंज ' हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोरयात वसले आहे .B.  दामोदर खोरे
56) खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही D.  आनंदभवन
57) ........या प्रकारच्या खडकापासून 'रेगूर ' ही काळी-कसदार मृदा निर्माण झाली आहे .C.  बेसोल्ट
58) भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाणवेळपेक्षा ...........तासांनी पुढे आहे .C.  साडेपाच
महाराष्ट्र राज्याची निर्मिती-मे 1960

भौगोलिक स्थानसाधारणत: भारताच्या मध्यवर्ती भागात
अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारअक्षांश : 15° 44' ते  22° 6' उत्तर अक्षवृत्त
रेखांश : 72° 36' ते  80° 54' पूर्व रेखावृत्त
क्षेत्रफळ
3
लाख 7 हजार 713  चौ.कि.मी. (3,07,713)
दक्षिण - उत्तर  लांबी  -> 720 कि.मी.पुर्व -  पश्चिम  लांबी  -> 800 कि.मी.
भारताच्या प्राकृतिक सीमा
पूर्व - चिरोली टेकडया   भामरागड डोंगर            पश्चिम - अरबी समुद्र
दक्षिण - तेरेखोल खाडी, हिरण्यकेशी  नदी            उत्तर - सातपुडा पर्वत
वायव्य - सातमाळा डोंगररांग (अक्राणी टेकड्या)       ईशान्य - दरकेसा टेकड्या   

भारताच्या राजकिय सीमा (शेजारील राज्ये)
 
उत्तर  - पूर्व - क्षत्तीसगड, मध्यप्रदेश             दक्षिण - कर्नाटक, गोवा
वायव्य - गुजरातदादरा व नगर हवेली     

प्राकृतिक विभाग – 5   
1. विदर्भ - 11 जिल्हे            2. मराठवाडा - जिल्हे       3. पश्चिम महाराष्ट्र - जिल्हे
4. 
कोकण - जिल्हे            5. खानदेश - जिल्हे          
प्रशासकिय  विभाग -7

       1.
औरंगाबाद - 4  जिल्हे        2. नागपूर - जिल्हे      3. मुंबई -जिल्हेव
4. 
नाशिक  - 5 जिल्हे    5. अमरावती - जिल्हे     6. पुणे - जिल्हे     7. नांदेड - जिल्हे 
 )    २००१च्या जनगणनेनुसार राज्यात दर हजार पुरुषांच्या
मागे ९२५ स्त्रिया आहे. हे प्रमाण २००१ साली ९२२ स्त्रिया असे होते.
)    २०११ च्या जनगणनेनुसार ५४.७७ % लोकसंख्या ग्रामीण भागात तर ४५.२३% लोकसंख्या नागरी भागात राहते.
तर सन २००१च्या जणगणनेनुसार राज्यात ग्रामीण लोकसंख्या ५७.६०% तर शहरी लोकसंख्या ४२.४० % इतकी होती.
)    भारताच्या एकूण क्षेत्रफळापकी ९.३६ % भाग म्हणजे एक दशांश हिस्सा महाराष्ट्राने व्यापलेला आहे. महाराष्ट्राला ७२० कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. देशातील एकूण समुद्र किनाऱ्यापकी ९.५८ % एवढा हिस्सा महाराष्ट्राला आला आहे.
)    देशातील रेगूर मृदेचा सर्वात मोठा साठा हा महाराष्ट्रात आहे.
)    आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून सह्याद्री पर्वतात आहे. तर तोरण माळ हे नंदुरबार जिल्ह्यात असून ते तोरणमाळच्या डोंगररांगेत स्थित आहे.
)    चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गावीलगढच्या डोंगरात आहे.
)    मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे.
)    कृष्णेच्या खोऱ्यात बॉक्साइट हे खनिज सापडते.
)     वर्धा व वैनगंगा यांचा संगम शिवने येथे झाला आहे.
१०)    उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे.
११) प्राकृतिक रचना ही महाराष्ट्रातील पर्जन्यावर परिणाम करणारे सर्वात मोठे घटक आहे.
१२)    महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान हे चंद्रपूर या ठिकाणी आढळून येते.
१३)    महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात जांभी मृदा आढळते.
१४)    ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळून येते
१५)    महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात लोह खनिजांचे मोठे साठे आढळून येतात.
१६)    अकोला जिल्ह्यातील महत्त्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प पारस या ठिकाणी आहे.
१७)    िठबक सिंचनामुळे ३० ते ६० % पाण्याची बचत होऊन त्यामुळे २५ ते ४० % अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.
१८)    महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक विहिरी अहमदनगर व त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात आहे. मात्र घनतेचा विचार करता सांगली व सोलापूर जिल्ह्यांत सर्वात जास्त आहे.
१९)    नाशिक जिल्ह्यात ठिबक सिंचनात अधिक प्रगती झालेली आढळून येते.
२०)    कोयना प्रकल्पअंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवाकनजिक जे धरण बांधण्यात आले, त्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर हे नाव देण्यात आले आहे.
२१)    मेरीनो जातीच्या मेंढय़ा या लोकरीसाठी उत्तम असतात.
२२)    सांगली जिल्ह्यातील जत हे ठिकाण खिलार बलांचे पदास केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
२३)    महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत.
२४) महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना बल्लारपूर येथे आहे.
२५)    महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सुत गिरणी इचलकरंजी येथे आहे.
२६)    हर्णे हे बंदर रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
२७) कोकण रेल्वेचा सर्वात लांब पुल शरावती नदीवर आहे.
२८)    न्हावाशेवा  हे महाराष्ट्रातील संपूर्ण संगणकीकृत बंदर आहे.
२९)    महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता गडचिरोली जिल्ह्यात आहे.
३०)    महाराष्ट्रात सहा वर्षे वयापर्यंतच्या मुला-मुलींमधील प्रमाण हजार पुरुषांमागे ८८३ स्त्रिया असे आहेत.
३१)    पितळ खोरे लेण्या या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.
३२)    नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे.
३३)    महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय नाशिक येथे आहे.
३४)    १ मे १९७८ रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली.
३५)    बाबा आमटे यांनी अपंग व कुष्ठरोगी यांच्यासाठी चालवलेले केंद्र हेमलकसा असून हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात आहे.
३६)    गडचिरोली हा जिल्हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे.
३७)    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर हे ठिकाण कोळसाच्या खाणी व औष्णिक विद्युत केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
३८)    चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाली येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे.
३९)    भोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र वर्धा जिल्ह्यात आहे.
४०)    ऊनकेश्वर, यवतमाळ या जिल्ह्य़ात गरम पाण्याचे झरे आढळतात.
४१)    लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
४२)    अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन १ जुल १९९८ रोजी वाशिम या जिल्ह्याची निर्मिती झाली.
४३)    संत तुकडोजी महाराजांची समाधी तसेच संत तुकडोजी महाराजांचे गुरुकुंज मोजरी अमरावती या जिल्ह्यात आहे.
४४)    अमरावती जिल्ह्यातील डोंगराळ भागात तिखाडी नावाचे गवत आढळते या गवतापासून रोसा हे तेल बनवले जाते.
४५)    औंढा नागनाथ या ठिकाणी महादेवाचे मंदिर असून हे ठिकाण िहगोली जिल्ह्यात आहे.
४६)    १ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन िहगोली जिल्ह्याची निर्मिती झाली.
४७)    िहगोली जिल्ह्यातील वनांमध्ये सुगंधी व औषधी तेल आढळते.
४८)    हेमांडपती शिल्पाचा नमुना असलेले तुळजाभवानीचे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.
४९)    औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली.
५०)    जाम हे ठिकाण समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान आहे.
५१)    औरंगाबाद जिल्ह्यातील पठण तालुक्यात आपेगाव हे ठिकाण संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आहे.
५२)    संत एकनाथ महाराजांची समाधी पठण येथे आहे.
५३)    जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी औरंगाबाद या ठिकाणी आहे.
५४) एक जुल १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.
५५)    नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे म्हणून याला आदिवासी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे.
५६)    नंदुरबार या ठिकाणी तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे.
५७)    फेकरी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे  हे ठिकाण जळगाव भुसावळ जवळ आहे.
५८)    प्रवरा नदीच्या काठी दायमाबाद या ठिकाणी ताम्रपाषाण काळातील काही अवशेष सापडतात.
५९)    महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था (मेरी) व महाराष्ट्र राज्य पोलीस अ‍ॅकॅडमी नाशिक येथे आहे.
६०)    गगनबावडा येथे गगनगिरी महाराजांचा मठ असून हे कोल्हापूर येथे आहे. 

1 टिप्पणी: